अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणपती बाप्पाच्या विसर्जनाचे स्टेटस WhatsApp वर करा शेअर
यंदा २७ ऑगस्टला गणरायाचं आगमन झालं आणि गणेशोत्सवाला सुरूवात झाली. भारताबरोबरच परदेशातही गणरायाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं. ढोल-ताशाच्या गजरात बाप्पा घरोघरी, मंडळांमध्ये विराजमान झाला. आता गणरायाचं आगमन होऊन १० दिवस होत आले आहेत. अनंत चतुर्दशी उद्यावर येऊन ठेपली आहे. गणेशोत्सवातील सर्वांत भावूक करणारा क्षण म्हणजे गणपती विसर्जन. यंदा ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते.