महिलांनो, उद्यावर गणेश चतुर्थी आणि अजून शॉपिंग केली नाही? मग फॉलो करा ‘हे’ फॅशन ट्रेंड्स
Ganesh Chaturthi Fashion Trends Outfits for Women: गणेश चतुर्थी उद्यावर येऊन ठेपली आहे आणि भारतात सगळीकडेच या सणाचं उत्साहाचं वातावरण दिसू लागलंय. १० दिवसांचा गणेशोत्सव हा केवळ गणपती बाप्पांवरील श्रद्धा दाखवण्यासाठी नसून कुटुंब आणि मित्र एकत्रपरिवारासोबत एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा प्रसंग असतो. या काळात भक्त घरी गणपतीची मूर्ती आणतात, तसंच विविध ठिकाणी दर्शनाला जातात, मोदकासारखे पारंपरिक पदार्थ बनवतात आणि नटून थटून उत्सवात सहभागी होतात.