History, Culture and origin of Ganpati: गणपतीचे उगमस्थान अफगाणिस्तानात!
गणपती किंवा विनायक ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय देवता आहे. या देवतेने जातीधर्माच्या सीमा ओलांडल्या असून ती सर्वधर्मियांची लोकप्रिय देवता ठरली आहे. गणपतीचा उल्लेख ऋग्वेदात बृहस्पती किंवा ब्रह्मणस्पती म्हणून आढळतो. प्राचीन साहित्यात गणपतीला विनायक म्हटले जाते. हिंदू, बौद्ध, जैन धर्मांमध्ये गणपतीचे अंकन आढळते. अफगाणिस्तानातील बेग्राम येथे गणपतीचे प्राचीन अंकन सापडते.