गणरायासाठीच्या नैवेद्यात आहारवैविध्य कसे आणाल? रेसिपी समजून घ्या…
गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत विविध नैवेद्याचे पदार्थ देवासमोर दाखविले जातात. ऋषीपंचमीला मिश्र भाजी, लाल तांदूळ आणि दही यांचा समावेश असतो. गोडधोड नैवेद्यात पुरणपोळी, मोदक, पातोळ्या, खांटोळी, धोणस, चिबूड-खीर, शिरवाळे, आंबेडाळ, घावन घाटलं, कडबू यांचा समावेश आहे. हे पदार्थ पोषक तत्त्वांनी भरलेले असून कोणतेही रसायन वापरले जात नाही. उत्सवात ताजे, सकस आणि पारंपरिक पदार्थ जपण्याची गरज आहे.