‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडची गणेश चतुर्थीनिमित्त पोस्ट, शेअर केले कुटुंबाबरोबरचे खास फोटो
गणेश चतुर्थीनिमित्त किरण गायकवाडने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यंदाचा गणेशोत्सव त्याच्यासाठी खास आहे कारण तो लग्नानंतर पहिल्यांदाच सहपत्नीक साजरा करीत आहे. किरण आणि वैष्णवी यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह पहिला गणेशोत्सव साजरा केला. त्यांनी घरातील बाप्पा आणि सजावट दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. किरणने मालिकेच्या चित्रीकरणातून ब्रेक घेत सण साजरा केला.