पाकिस्तानची अजब तऱ्हा; राग भारतीय संघाचा, पण कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर!
आशिया चषक २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. मात्र, सामन्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन केले नाही. भारतीय संघाने पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून हे केले असल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानने यावर तीव्र संताप व्यक्त केला आणि आयसीसीकडे तक्रार केली. पाकिस्तानने त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट विभागाचे संचालक उस्मान वाहला यांना निलंबित केले आहे.