माजी क्रिकेटर सुरेश रैनाच्या अडचणी वाढल्या, ईडीने बजावलं समन्स; दिल्लीत होणार चौकशी
माजी क्रिकेटर सुरेश रैनाच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने त्याला बेटिंग अॅपचा प्रचार केल्याप्रकरणी समन्स बजावले आहे. १३ ऑगस्ट रोजी दिल्लीतील ईडी कार्यालयात त्याची चौकशी होणार आहे. डिसेंबर २०२४ मध्ये 1xBet या बेटिंग अॅपने रैनाला ब्रँड अॅम्बेसेडर केले होते. याआधी हरभजन सिंह आणि युवराज सिंह यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. रैनाच्या आंतरराष्ट्रीय आणि आयपीएल कारकीर्दीत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.