IPL 2025 मधील पराभवानंतर प्रीतीने झिंटाची भावुक पोस्ट, चाहत्यांना दिलं ‘हे’ खास वचन
इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सवर ६ धावांनी विजय मिळवून प्रथमच विजेतेपद पटकावले. पंजाब किंग्सच्या सह-मालक प्रीती झिंटा निराश झाली. पण प्रीतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संघाच्या संघर्षाचे आणि जिद्दीचे कौतुक केले व चाहत्यांचे आभार मानले. यात तिने "हा प्रवास आम्हाला हवा होता तसा संपला नाही. पण हा प्रवास रोमांचक, मनोरंजक आणि खूपच प्रेरणादायी होता. असं म्हटलं आहे. तसंच तिने पुढील वर्षी विजय साजरा करण्याचे चाहत्यांना वचनही दिलं आहे.