‘करो या मरो’च्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून २२ वर्षीय ‘राज अंगद बावा’ला संघात स्थान
मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमधील दुसऱ्या एलिमिनेटर सामन्यात २२ वर्षीय अष्टपैलू खेळाडू राज अंगद बावा याला संधी देण्यात आली आहे. राज बावा डावखुरा फलंदाज असून उजव्या हाताने मध्यम वेगवान गोलंदाजी करतो.