अभिनेते नाना पाटेकरांचं भारत-पाकिस्तान सामन्यावर मोठं विधान; म्हणाले, “आपण त्यांच्याशी…”
दुबई येथे होत असलेल्या आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यावर विविध क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेनेने (ठाकरे) महाराष्ट्रात आंदोलनाची भूमिका घेतली आहे, तर पहलगाममध्ये बळी पडलेल्या कुटुंबाचे नातेवाईक बीसीसीआयवर टीका करत आहेत. मनोरंजन क्षेत्रातूनही प्रतिक्रिया येत असून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आजच्या सामन्यावर मोठी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.