टेनिसपटू राधिका यादवच्या हत्येवर नीरज चोप्राची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, “कुटुंबानं…”
हरियाणाची टेनिसपटू राधिका यादव हिची तिच्या वडिलांनी हत्या केल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. राधिकाने टेनिसमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली होती. वडिलांनी कुटुंबातील वादामुळे तिची हत्या केली. या प्रकरणानंतर ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे. हरियाणामधील क्रीडा जगतात अनेक महिलांनी देश, जागतिक पातळीवर बहुमान मिळवला असल्याचे त्याने सांगितले.