पाकिस्तानचा पार कचरा केला; कबड्डीच्या संघानेही हस्तांदोलन केलं नाही, सामनाही जिंकला
भारतीय युवा कबड्डी संघाने तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानला ८१-२६ ने पराभूत केले आणि पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळले. पहिल्यांदा आशियाई क्रिकेट स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न करण्याची घटना घडली होती. यानंतर महिला क्रिकेट संघानेही हस्तांदोलन टाळले. आता कबड्डी संघानेही हाच कित्ता गिरवला.