पृथ्वी शॉला राग अनावर, भर मैदानात मित्राच्या अंगावर धावून गेला अन्…
रणजी चषक २०२५-२६ सुरू होण्याआधी मुंबई व महाराष्ट्राच्या संघात पुण्यात सराव सामना झाला. पहिल्याच दिवशी पृथ्वी शॉ आणि मुशीर खानमध्ये वाद झाला. पृथ्वी शॉने २१९ चेंडूत १८१ धावा केल्या, पण मुशीरने त्याचा झेल घेतला. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. पंचांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला. पृथ्वी शॉ पुनरागमनासाठी प्रयत्नशील असून यंदाच्या रणजी स्पर्धेत त्याच्याकडे लक्ष असेल.