मेंदूसाठी विष ठरतात ‘हे’ ४ पदार्थ! विसरण्याचा आजारच नाही तर होऊ शकतो गंभीर परिणाम
Bad Foods for Brain: आपला मेंदू आपल्या संपूर्ण शरीराला आपल्या आदेशानुसार काम करायला लावतो. आपला प्रत्येक विचार, आठवण, भावना आणि निर्णय घेण्याची क्षमता याच्यावरच अवलंबून असते. जेव्हा मेंदू काम करणं थांबवतं, तेव्हा त्याला 'डेड ब्रेन' म्हटलं जातं. शरीराच्या या महत्त्वाच्या अवयवाला निसर्गाने खूप सुरक्षित जागेत ठेवलेलं आहे, जेणेकरून त्याला कोणतीही इजा किंवा नुकसान होऊ नये. मात्र काही गोष्टी या मेंदूला खूप हानी पोहोचवतात.