ब्रेन ट्यूमर झाला की सुरुवातीला दिसतात ही लक्षणे! डोकेदुखी समजून दुर्लक्ष करू नका…
Brain Tumor Symptoms: ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदू किंवा त्याच्या आसपासच्या पेशींची असामान्य वाढ होणे. या वाढलेल्या पेशी एक प्रकारची गाठ किंवा सूज तयार करतात, ज्याला ट्यूमर म्हणतात. ब्रेन ट्यूमर हा फक्त मेंदूमध्येच नाही, तर त्याच्या आसपासच्या भागांमध्येही होऊ शकतो, जसे की नर्व्हस, पिट्युटरी ग्रंथी (Pituitary gland), पाइनियल ग्रंथी (Pineal gland) किंवा मेंदूला झाकणाऱ्या पडद्यांमध्ये (Meninges) होऊ शकतो.