तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! दिसतात ‘ही’ लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ही ४ फळे
Colon Cancer Symptoms: आजकाल चुकीचे खाणे-पिणे आणि विचित्र जीवनशैलीमुळे कमी वयातच अनेक गंभीर आजार लोकांना होऊ लागले आहेत. त्यापैकी एक म्हणजे कोलन कॅन्सर. हा आजार आता फक्त वयस्कर लोकांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तरुणांमध्येही तो झपाट्याने पसरत आहे. १९९९ ते २०२० या काळात १० ते ४४ वयोगटातील लोकांमध्ये या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या खूप वाढली आहे.