वजन वाढल्याने होऊ शकतो कॅन्सर! दुर्लक्ष करणं पडेल महागात; डॉक्टरांनी दिला सावधगिरीचा इशारा
Fat increase Risk Cancer: साधारणपणे लोक लठ्ठपणाला आयुष्याचा भाग समजतात. पण, आता पुरावे आहेत की हा एक मोठा प्रश्न आहे आणि अनेक गंभीर आजारांचं कारणसुद्धा. प्रत्येक वयाच्या लोकांमध्ये वाढणारे लठ्ठपण हेच दाखवते की हा एक गंभीर आरोग्याचा प्रश्न आहे, म्हणूनच फक्त वजन वाढले आहे असे समजून लठ्ठपणाला दुर्लक्ष करता येणार नाही. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पटपडगंज येथील रोबोटिक आणि लेप्रोस्कोपिक सर्जरी विभागाचे वरिष्ठ संचालक डॉ. आशीष गौतम यांनी सांगितले की, वजन कमी करण्यासाठी काय करावे आणि वजन वाढल्याने कोणते आजार होऊ शकतात.