उन्हाळ्यासह पावसाळ्यातही येतात घामोळे, पुरळ? आंघोळीच्या पाण्यात ‘या’ २ गोष्टी मिसळा
Ghamole Remedies: सध्याच्या या उन्हाळी, पावसाळी हंगामात घामोळे येणे, पुरळ येणे किंवा जळजळ होणे आणि त्वचेशी संबंधित समस्या अगदी सामान्य होतात. तीव्र सूर्यप्रकाश वाढणारी उष्णता आणि घाम येणे तसंच मध्येच पाऊस पडणे यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे, जळजळ होणे आणि लालसरपणा यासारख्या समस्या येणे स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत, जर आंघोळीच्या पाण्यात काही खास नैसर्गिक गोष्टी टाकल्या तर ते त्वचेला थंड आणि आराम देतेच, शिवाय त्वचेच्या अनेक समस्यांपासूनही वाचवते.