व्यायाम करताना ह्रदयविकाराचा झटका येण्याची भीती वाटतेय? मग करा ‘या’ ४ चाचण्या
हल्ली तरुणांमध्ये फिटनेसची एक वेगळी क्रेझ दिसून येते. जिममध्ये जाणे, धावणे, वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेणे हा आता एक ट्रेंड बनताना दिसतोय. कारण- प्रत्येकाला हल्ली तरुण, तजेलदार व तंदुरुस्त दिसायचे आहे. पण, फिट राहण्याच्या नादात हल्ली तरुण वेगवेगळ्या आजारांची शिकार होताना दिसतायत. त्यात वर्कआउटदरम्यान आता तरुणांना अचानक हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना वाढताना दिसतात. बाहेरुन निरोगी, उत्साही, तंदुरुस्त दिसणाऱ्या ३० ते ४० वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण अधिक आहे.