केस गळतीही थांबेल आणि चमकही वाढेल! डार्क चॉकलेट ठरेल केसांसाठी फायदेशीर, करा ‘असा’ वापर…
Dark Chocolate for Hair Growth: एवढं चविष्ट चॉकलेट केसांच्या वाढीस मदत करू शकतं, हे खरंच आश्चर्यकारक वाटतं. आपण सामान्यतः चॉकलेटला एक चविष्ट स्वीट समजतो, पण खरं सांगायचं तर या गोड पदार्थात केस गळती थांबवण्यासाठी उपयुक्त असे अनेक पौष्टिक घटक असतात. डार्क चॉकलेटमध्ये ७०% कोको असतो, जो केवळ खाण्यासाठीच चविष्ट नसतो, तर त्यामध्ये केसांसाठी फायदेशीर फॅटी अॅसिड्स आणि व्हिटॅमिन्स असतात. हे घटक केसांना ओलावा देतात, केस चमकदार आणि आरोग्यदायी बनवतात.