सर्व आजारांपासून राहाल दूर, फक्त दिवसातून ‘या’ ५ वेळेत प्या पाणी!
शरीराचा ७० ते ७५ टक्के भाग हा पाण्याने व्यापला आहे, त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी पाण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे दिवसभरात किमान ३ ते ४ लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. रोज योग्य प्रमाणात पाणी पिणे इथपर्यंत ठीक आहे, पण पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? याविषयीदेखील माहिती असणे गरजेचे आहे. याच विषयावर जीवा आयुर्वेदाचे संस्थापक आणि संचालक डॉ. प्रताप चौहान यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे.