How to Prevent Falls वय झाल्यानंतर पडणं कसं टाळाल? (हेल्दी एजिंग: भाग 2)
वर्ल्ड कॉन्फेडरेशन ऑफ फिजिकल थेरपीच्या आकडेवारीनुसार, पडणं हे वृद्ध व्यक्तींमध्ये गंभीर समस्या आहे. ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये पडण्याचा धोका अधिक असतो. शारीरिक बदल, औषधांचे साइड इफेक्ट्स आणि बाह्य घटक यामुळे पडण्याची शक्यता वाढते. फिजिओथेरपी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम, घर सुरक्षित करणं आणि योग्य पादत्राणे वापरणं यामुळे पडण्याचा धोका कमी होतो. यामुळे वृद्ध व्यक्तींचा आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक स्वावलंबी होतात.