किडनी फेल्युअर होण्यासाठी ‘या’ ८ सवयी कारणीभूत; वेळीच आळा घालणं का गरजेचं आहे?
रोजचं काम, कुटुंब आणि भविष्य अशा शेकडो गोष्टींचा विचार आपण करतो. या धबडग्यात शरीरातील एका छोट्याशा अवयवाकडे दुर्लक्षच करतो. खरे तर हा अवयवच आपल्या आयुष्याचा आधार आहे, हा अवयव म्हणजे किडनी. रक्तातील विषारी द्रव्यं गाळणं, बाहेर टाकणं, पाणी-खनिजांचं संतुलन राखणं, रक्तदाबावर नियंत्रण ठेवणं, हाडं आणि रक्तनिर्मितीची काळजी घेणं अशा असंख्य जबाबदाऱ्या ही किडनी दररोज व्यवस्थित पार पाडते. तरीही, आपल्याला नकळत लागलेल्या काही सवयी तिला हळूहळू कमकुवत करतात. म्हणूनच या वाईट सवयी वेळीच ओळखून त्या बदलणं आवश्यक आहे.