एका दिवसात किती चपात्या खाऊ शकतो? याहून जास्त खात असाल तर सावधान! होऊ शकतो गंभीर परिणाम…
How Many Rotis to Eat in a Day: भारतात खाण्याची गोष्ट निघाली आणि चपातीचं नाव आलं नाही, असं होऊच शकत नाही. घरचं जेवण असो, ऑफिसचं डब्यातलं जेवण असो किंवा लग्नसमारंभ चपाती सगळीकडे असतेच. बऱ्याच लोकांना चपातीशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. काही लोक सकाळ-संध्याकाळ दोन-दोन पोळ्या खातात, तर काहींना चार-पाच चपात्याही कमी वाटतात.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 