सकाळी उठताच पोटातील सगळी घाण निघेल बाहेर! रात्री झोपण्यापूर्वी फक्त ‘या’ ३ गोष्टी खा…
How to clean Stomach in Morning: बद्धकोष्ठता आजकाल खूप सामान्य समस्या झाली आहे. ही जास्त काळ राहिल्यास गंभीर आजारही होऊ शकतात. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे चुकीचे जेवण, पाणी कमी पिणे, ताण, अन्नात तंतू कमी असणे आणि अनियमित दिनचर्या. बद्धकोष्ठता असल्यास शौच करणे कठीण होते, ज्यामुळे पोट जड वाटणे, गॅस, पित्त आणि अपचन यांसारख्या समस्या होतात. ही अवस्था जास्त काळ राहिल्यास मूळव्याध (पाईल्स) सारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.