पोट होईल झटक्यात साफ! फक्त ही पांढरी गोष्ट खा, पचनशक्ती सुधारेल तर गॅस, अॅसिडिटी होईल दूर
Digestive Food: चविष्ट, कुरकुरीत आणि गोड मुळा खाल्ल्याने फक्त जेवणाची मजा वाढत नाही तर पचनही सुधारते. मुळा हे साधारणपणे हिवाळ्यातील पिक आहे, पण तो वर्षभर उपलब्ध असतो. लोक जास्त करून सॅलड, पराठा, भाजी किंवा लोणचं करण्यासाठी मुळ्याचा वापर करतात. ही भाजी पोषक घटकांनी भरलेली असते. मुळ्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतू (फायबर) असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मुळा ही कमी कॅलरी, जास्त फायबर आणि जीवनसत्त्व सी ने भरलेली भाजी आहे जी पचन सुधारते, शरीर शुद्ध करते आणि एकूणच आरोग्य चांगले ठेवते.