International Yoga Day: आजच्या धावपळीच्या जीवनात योग का महत्त्वाचा? जाणून घ्या फायदे
Why Yoga is Important: आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. यामागचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये योगाचे महत्त्व आणि फायदे याबद्दल जागरूकता निर्माण करणे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करताना आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची कल्पना मांडली होती. त्यांनी सांगितले की योग हा सर्वांसाठी उपयुक्त आहे आणि तो शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील समतोल साधतो.