किडनी खराब झालीय हे आधीच कळू शकतं! ‘ही’ ५ लक्षणे लोकांच्या लक्षातच येत नाहीत, जाणून घ्या
Kidney Damage Signs: किडनी शरीराच्या एकूण आरोग्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. किडनी अपायकारक पदार्थ बाहेर टाकते, पाणी आणि क्षार यांचे संतुलन राखते, रक्तदाब सांभाळते आणि लाल रक्तपेशी तयार होण्यासही मदत करते. तरीसुद्धा, किडनी बिघडण्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष होते किंवा ती छोटी समस्या समजली जातात. सुरुवातीला लक्षणं न दाखवणारा आजार क्रोनिक किडनी डिसीज (CKD) वेळेत ओळखल्यास त्याची प्रगती थांबवता येऊ शकते.