रात्री दिसतात लिव्हर, किडनी खराब झाल्याची ‘ही’ गंभीर लक्षणं; दुर्लक्ष न करता जाणून घ्या
Kidney, Liver Heart Problem Symptoms at Night: एका निरोगी आणि सक्रिय आयुष्यासाठी शरीरातील आणि बाहेरील अवयव नीट काम करणे खूप महत्त्वाचे आहे. बाहेरील अवयव म्हणजे हात-पाय, डोळे, नाक आणि कान. हे अवयव आपल्याला रोजच्या कामात, संतुलन ठेवण्यात, गोष्टी जाणवण्यात आणि बोलण्यात मदत करतात. शरीरातील अवयव म्हणजे हृदय, किडनी, फुफ्फुसे, लिव्हर आणि पोट. हे अवयव शरीरातील चयापचय, रक्ताचा प्रवाह, ऑक्सिजनचा पुरवठा आणि शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) बाहेर काढणे यांसारखी महत्त्वाची कामे करतात.