किचनमधील सिंकमध्ये वारंवार पाणी साचतं? मग ‘हा’ जुगाड आताच करून बघा, कचराही होईल साफ
Kitchen Basin Water Blockage: जर किचनमधील सिंक पाण्याने भरला आणि तासनतास पाण्याचा निचरा झाला नाही, तर किचनमधील सर्व काम थांबतं. शेवटी ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याला प्लंबरला बोलाववं लागतं आणि अनावश्यक खर्च होतो. खरंतर, जेव्हा आपण किचनमध्ये डाळ, भात, भाज्या इत्यादी बनवतो, तेव्हा त्या धुताना काही गोष्टी सिंकच्या पाईपमध्ये अडकतात, ज्या सहज बाहेर पडत नाहीत आणि त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास त्रास होतो.