जास्त उन्हात राहिल्याने ओठांचा कॅन्सर होऊ शकतो! ओठावर दिसतात ‘ही’ लक्षणे…
Lip Cancer Symptoms: ओठांचा कॅन्सर बहुतेक वेळा उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे होतो. तो वेळेत ओळखला नाही तर धोकादायक ठरू शकतो. ओठांचा कॅन्सर तेव्हा होतो, जेव्हा पेशी अनियमितपणे वाढतात आणि ओठावर गाठी किंवा जखमा तयार होतात. HT Lifestyle ला दिलेल्या मुलाखतीत मुंबईच्या सैफी हॉस्पिटलमधील कन्सल्टंट ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. मोहम्मद मिठी यांनी सांगितले की, "बहुतेक ओठांचा कॅन्सर हा उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे होतो. पण, तंबाखू चघळणे, पाईपमधून तंबाखू ओढणे, धूम्रपान, जुने दातांचे आजार आणि दारू पिणे यामुळेही ओठांचा कॅन्सर होऊ शकतो."