मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरूवार कधी? पूजा विधी अन् मुहूर्त जाणून घ्या…
Margashirsha Guruvar 2025 start date: मार्गशीर्ष महिना येत्या दोन दिवसांनी सुरू होईल. कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना येतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, मार्गशीर्ष हा नववा महिना आहे. हिंदू धर्मात १२ महिने प्रत्येक देवतेला समर्पित आहेत. त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्व आहे. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचे मानले जाते. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत केले जाते.