तोंडाचा कॅन्सर झाला तर आधीच दिसतात ‘ही’ लक्षणं; दातांमध्ये कीड, तोंडातून दुर्गंधी आणि…
Mouth Cancer Symptoms: तोंडाची स्वच्छता ठेवणं खूपच महत्त्वाचं आहे. जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, जसे की कॅन्सर. अनेक लोकांना वाटतं की, तोंडाची स्वच्छता म्हणजे फक्त दातांची काळजी घेणे; पण हे पूर्णपणे खरं नाही.
तोंडाची चुकीच्या पद्धतीनं काळजी घेणं हे हृदयाच्या आजारांचं कारण ठरू शकतं, हे आपल्याला माहीतच आहे; पण तुम्हाला हे माहीत आहे का की, तोंडाची नीट स्वच्छता न ठेवण्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकतं?