टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाताय? मग होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार, दुर्लक्ष केलं तर पडेल महागात
Mobile in Toilet Disease: आजकाल मोबाईल आपल्यासाठी खूप महत्त्वाचा भाग झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोक सतत मोबाईल वापरतात. एक दिवस फोन दूर ठेवला तर काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटतं.
आजकाल लोक मोबाईल टॉयलेटमध्येही नेतात आणि तिथे बराच वेळ बसून राहतात. पण, अलीकडच्या संशोधनानुसार टॉयलेटमध्ये मोबाईल वापरण्याची सवय ही काही साधी नाही, तर ती गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकते. अभ्यासामध्ये आढळलं आहे की, टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणाऱ्यांना मुळव्याध होण्याचा धोका ४६% ने वाढतो.