अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरमुळे निधन! कॅन्सर झालाय की नाही हे हे सुरूवातीलाच कळू शकतं
Priya Marathe Death Due to Cancer: ३१ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईने आपली आवडती टीव्ही अभिनेत्री गमावली. हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये 'पवित्र रिश्ता' सारख्या मालिकांमधून ओळख मिळवलेल्या प्रिया मराठेचे कॅन्सरशी वर्षभर लढा देऊन निधन झाले. तिचे वय फक्त ३८ वर्षे होते. उपचार सुरू असूनही तिची प्रकृती सुधारली नाही आणि रविवारी सकाळी मुंबईतील घरी तिने अखेरचा श्वास घेतला.