सतत रील पाहण्याची सवय दारू पिण्याइतकी घातक? न्यूरोलॉजिस्ट काय सांगतात, वाचाच
Does Watching Reels Affect Your Brain Like Alcohol : आजकाल सोशल मीडियावर रील्स पाहण्याचा ट्रेंड सर्व वयोगटांतील लोकांमध्ये झपाट्यानं वाढतोय. तासन् तास ते रील्स पाहण्यात अन् शेअर करण्यात घालवतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते रील्स पाहण्यात अधिक वेळ घालवतात. काही सेकंदांच्या या रील्सचे व्हिडीओ पाहण्यास कमी वेळ लागतो; पण त्याचा मेंदूवर वाईट परिणाम होतो.