सिगारेटमुळे दात पिवळे झालेत? तोंडातून दुर्गंध येतोय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या गोष्टी करा
Yellow Teeth Solution: पांढरे आणि सुंदर दात केवळ चेहऱ्याची शोभाच वाढवत नाहीत, तर तुमच्या तोंडाच्या आरोग्याची स्थितीही स्पष्ट करतात. आजच्या काळात लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. लहान वयातच अनेक मुलांना वाईट सवयी लागतात. आजकालचे तरुण सिगारेट, तंबाखू, हुक्का आणि इतर नशेच्या गोष्टींच्या आहारी जातात आणि त्या गोष्टींचा पहिला परिणाम त्यांच्या दातांवर होतो.