IPS अंजना कृष्णा यांच्याशी झालेल्या खडाजंगीवर अजित पवार यांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवरून दम दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला. विरोधकांनी पवारांवर अवैध उत्खनन रोखण्याचे काम थांबवण्याचा आरोप केला. अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, त्यांचा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर परिस्थिती शांत ठेवण्याचा होता.