‘पार्थ पवार पुढे का येत नाहीत?’; अजित पवार म्हणाले, “त्याचा बापानं…”
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमिनीच्या खरेदी प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. विरोधकांनी १८०० कोटींची जमीन ३०० कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेऊन मुलाची बाजू मांडली. अजित पवार यांनी आरोप फेटाळून लावले आणि निवडणुका जवळ आल्या की आरोप होतात असे सांगितले.