लातूरमधील मारहाण प्रकारावर अजित पवार भडकले; थेट राजीनाम्याचे दिले आदेश, नेमकं घडलं काय?
रविवारी लातूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले, तर छावा संघटनेने तीव्र निषेध केला. या घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झाले आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. सोमवारी सुनील तटकरेंनी पत्रकार परिषदेत सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली. अजित पवारांनी पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात वर्तन स्वीकारले जाणार नाही, असे स्पष्ट केले.