“अरे आत्महत्या करण्याऐवजी एखाद्या आमदाराला…”, बच्चू कडू यांचे वादग्रस्त विधान
बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात शेतकरी हक्क परिषदेत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी "आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका" असे खळबळजनक विधान केले. या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार, भाजपाचे प्रवीण दरेकर आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.