“भाजपानं आपला डीएनए लक्षात ठेवावा”, भुजबळांचा थेट हल्लाबोल; म्हणाले, “माझी नाराजी…”
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे आणि राज्य सरकारच्या जीआरमुळे मराठा आंदोलक समाधानी असले तरी ओबीसी समाजात असंतोष आहे. छगन भुजबळांनी जीआरचा अभ्यास करून कायदेशीर पर्यायांचा निर्णय घेण्याची भूमिका मांडली आहे. त्यांनी न्यायालयात जाण्याची गरज व्यक्त केली आहे आणि भाजपाला लक्ष्य केले आहे.