“मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे, त्यांना पुन्हा…”, फडणवीसांचं शपथ घेण्यापूर्वी विधान!
देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. याआधी त्यांनी दोन वेळा हे पद भूषवलं आहे. यंदा भरभक्कम बहुमताच्या जोरावर ते पूर्ण कार्यकाळ पदावर राहणार आहेत. विरोधकांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ते सगळं विसरून काम करणार आहेत. विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांच्या भूमिकांकडे दुर्लक्ष करणार नाहीत.