Devendra Fadnavis on Opposition: देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. याआधी दोन वेळा त्यांनी हे पद भूषवलं आहे. त्यातील पहिली टर्म त्यांनी पूर्ण केली असून दुसऱ्यावेळी मात्र अवघ्या ७२ तासांसाठी ते पदावर होते. त्यामुळे सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी असणारे नेते ही नोंदही त्यांच्यानावे झाली आहे. पण यंदा भरभक्कम बहुमताच्या जोरावर पूर्ण कार्यकाळ पदावर राहण्यासाठी फडणवीस सज्ज झाले आहेत. Fadnavis 3.0 अर्थात देवेंद्र फडणवीसांची ही तिसरी टर्म कशी असेल? याबाबत आता चर्चा सुरू झालेली असतानाच त्यांनी एका मुलाखतीमध्ये त्याबाबत सूचक भाष्य केलं आहे.

यंदाच्या निवडणुकीत विरोधकांना जनतेनं साफ नाकारल्याचं चित्र निर्माण झालं आहे. २८८ पैकी अवघ्या ४९ जागांवर महाविकास आघाडी अडकली. उलट महायुतीच्या पारड्यात जनतेनं तब्बल २३५ जागांचं भरभरून दान दिलं. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झालं. एकीकडे लोकसभा निवडणुकीतील कौल विधानसभेला उलट कसा झाला? यावर महाविकास आघाडीमध्ये विचारमंथन चालू असताना दुसरीकडे महायुतीमध्ये कुणाला किती आणि कुठली मंत्रीपदं मिळणार यावर बैठका होत आहेत. पण फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद निश्चित झाल्यानंतर त्यांनी विरोधकांबाबत केलेलं सूचक विधान सध्या चर्चेत आलं आहे.

Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितलं तर व्हाल का? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पक्ष जे सांगेल…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आम्ही ‘वार’ आडनाव असलेल्यांचा सन्मान करतो, कारण…”, मुनगंटीवार, वडेट्टीवारांचा उल्लेख करत फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आयुष्यात कधीच अंमली पदार्थाला स्पर्श केला नाही, कुणाची हिंमतही…”, देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितलं?

“पातळी सोडून टीका झाली, पण आता…”

गेल्या अडीच वर्षांत विरोधकांकडून पातळी सोडून आपल्यावर टीका झाली, पण आता ते सगळं विसरून काम करणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. २०२२ च्या सत्तांतरानंतर फडणवीसांनी भर विधानसभेत बोलताना विरोधकांना माफ करून त्यांचा बदला घेणार असल्याचं विधान केलं होतं. याहीवेळी विरोधकांना माफी हाच आपला बदला असणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

Eknath Shinde : “शिंदे उपमुख्यमंत्री होणार”, महायुतीच्या बैठकीतील माहिती देत आठवले म्हणाले, “फडणवीसांनीच सांगितलंय…”

“विरोधकांनी माझ्यावर बदनामीजनक टीका-टिप्पणी केली. मी पुन्हा एकदा त्यांचा बदला घेणार आहे. पण याहीवेळी त्यांना मी माफ केलं असून त्यांना माफी हाच माझा बदला आहे. मी कधीच कुणाचा द्वेषी नव्हतो. काहींनी त्यांच्या फायद्यासाठी माझी एखाद्या खलनायकासारखी प्रतिमा तयार केली. पण जनतेनं आमच्यावर विश्वास दाखवून त्या सगळ्यांना परस्पर उत्तर दिलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस या मुलाखतीमध्ये म्हणाले. दरम्यान, यावेळी विरोधकांची संख्या विधानसभेत खूप कमी असली, तरी तेही लोकप्रतिनिधीच असून त्यांच्या भूमिकांकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत.

Story img Loader