अजित पवार, शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची संधी कधी? युतीबाबत फडणवीसांचं ‘हे’ विधान चर्चेत!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच प्रमुख पक्ष असल्याचं नमूद केलं आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुका सेना-राष्ट्रवादीसोबत लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. फडणवीसांनी युतीतील संबंधांवर भाष्य करताना, तिघांनाही राजकारणातील सीमांची जाणीव असल्याचं सांगितलं. तसेच, युतीमध्ये नव्या भिडूसाठी स्कोप नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.