देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मी उद्धव ठाकरेंचे आभार मानतो कारण त्यांनी…”
महायुतीच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या कारभारामुळेच आमचं सरकार आलं. मराठी माणसाचं पोट भाषणं देऊन भरणार नाही, असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. मराठी माणसाला घर देण्याचं काम महायुती सरकारने केलं आहे. त्रिभाषा सूत्राबाबतही त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.