‘शरद पवार-अजित पवार एकत्र येतील का?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझ्याकडे अशी शक्ती…”
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेनंतर, शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी पक्ष फुटल्याबद्दल भाष्य केले. अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का, याबाबत विचारले असता, देवेंद्र फडणवीस यांनी तेच सांगू शकतात असे उत्तर दिले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे ठरणार आहे.