मुख्यमंत्री फडणवीसांच्या कौतुकासाठी ‘देवाभाऊ’ कॅम्पेन; शिंदे म्हणाले, “श्रेयवादाच्या..”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या हजारो मराठा आंदोलकांना शांतपणे परतविल्यानंतर भाजपाकडून त्यांचे कौतुक झाले. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी तीन जीआर काढण्यात आले आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण संपवले. यानंतर 'देवाभाऊ' कॅम्पेनद्वारे फडणवीस यांचे कौतुक करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.