“मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणे यांनी…”, ‘त्या’ फॉर्च्युनरची सर्वत्र चर्चा
वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे. हुंड्यात सोने, नाणे, रोख रक्कम आणि फॉर्च्युनर गाडी दिल्याने समाजातील रुढीवादी परंपरा चर्चेत आल्या. वैष्णवीच्या वडिलांनी हगवणे कुटुंबियांना फॉर्च्युनर गाडी दिल्याने फॉर्च्युनर गाडी असलेल्या प्रत्येकाकडे संशयाने पाहिलं जातंय. सोलापुरातील एका गाडी मालकाने आपल्या गाडीच्या मागे संदेश लिहून या प्रकरणावर भाष्य केलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.