“हिंदी ही मुंबईची बोलीभाषा”, शिंदेंच्या मंत्र्याच्या वक्तव्याची चर्चा
राज्यात भाषिक वाद सुरू असताना, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे की हिंदी ही मराठीची बोलीभाषा आहे. ते मीरा भाईंदर येथे बोलत होते. सरनाईक म्हणाले की, ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये हिंदी बोलणं सामान्य आहे आणि हिंदी ही मुंबईची बोलीभाषा बनली आहे. मराठी मातृभाषा असली तरी हिंदी लाडकी बहीण आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.